सिंगल राहण्याचेही अनेक फायदे


सध्या सिंगल रहाणे पसंत करणाऱ्या लोकांची संख्या वाढली असून जो व्यक्ती सिंगल आहे तो व्यक्ती स्वत:वर, स्वत:ला खूश ठेवण्यावर पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या सर्वेक्षणामधूनही हे समोर आले आहे की, सिंगल राहण्याचेही अनेक फायदे आहेत.

सर्वेक्षणात हे समोर आले आहे की, ज्या लोकांचे लग्न झालेले आहे किंवा जे लोक रिलेशनशीपमध्ये आहेत, अशांच्या तुलनेत जे लोक सिंगल असतात त्यांचे आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी आणि शेजा-यांशी नाते अधिक घट्ट होते. त्याचबरोबर एका अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की, एका आठवड्यात १५० मिनिटे एक्सरसाईजही ब्रिटेनचे ७३ टक्के लोक करू शकत नाही. हे सगळे लोक विवाहीत आहेत. तेच सिंगल किंवा घटस्फोटीत लोक अधिक फिट राहतात. २०१३ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार हे समोर येते की, नव्याने लग्न झालेल्या जोडप्याचे ४ वर्षातच वजन वाढते.

तुम्ही जेव्हा सिंगल असता त्यावेळी तुम्ही तुमचे करिअर अधिक चांगले करण्यासाठी वेळ देऊ शकता. सर्वेक्षणामधून हे समोर आले आहे की, लग्न झालेल्या किंवा रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक आपल्या कामाला जास्त एन्जॉय करतात. आपल्या नातेवाईकांच्या घरी जायचे असो वा माहेरच्या लोकांसाठी गिफ्ट घ्यायचे असो किंवा आपल्या पार्टनरसोबत डेटवर जायचे असो. अशावेळी सिंगल लोकांपेक्षा लग्न झालेल्या लोकांचा खर्च अधिक होतो. यासोबतच सिंगल लोकांची कर्ज घेण्याची शक्यताही कमी असते. सिंगल असण्याची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कुणाही सोबत शेअर करावा लागत नाही. जेव्हा तुमचे मन असेल तेव्हा तुम्ही झोपू शकता, कधीही उठू शकता, कुणीही विचारणारे नसते आणि असे झाल्याने तुमची झोपही पूर्ण होईल आणि त्यामुळे कामही चांगले होईल.

Leave a Comment