मधुचंद्रासाठी भारतीयांनी ‘या’ शहराला दिली सर्वाधिक पसंती!


मधुचंद्रासाठी भारतातील अनेक मंडळी परदेशात जाणे पसंत करतात. कारण मधुचंद्र हा असा क्षणांचा गुच्छ असतो, तो तुमच्या पुढील आयुष्यात आनंद भरण्यास मदत करत असतात. त्यामुळे नवदाम्पत्य मधुचंद्राला जाताना योग्य ठिकाण निवडले जाते. नुकतेच एक सर्वेक्षणसमोर आले असून ज्यामध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून अधिक पसंती मिळत आहे. आपला जाज्वल्य असा इतिहास आणि भव्य राजवाड्यांसाठी व्हिएन्ना शहर ओळखले जाते.

मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात व्हिएन्ना पर्यटक बोर्डाच्या जनसंपर्क अधिकारी इसाबेला रुटर यांनी सांगितले, तणावपूर्ण वातावरणापासून व्हिएन्ना शहर लांब आहे. राजधानी म्हणून वेगळा अनुभवही मिळतो. २०१७ मध्ये २० ते ३०टक्के किंवा त्याहून अधिक भारतीय पर्यटक व्हिएन्नात येण्याची आशा आहे. २०१६मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी व्हिएन्नालाच पसंती दिली. त्यामुळे व्हिएन्ना भारतीयांच्या आवडीचे ठिकाण बनू पाहत आहे. भारतीयांसंबंधी आणखी इंटरेस्टिंग आकडेवारी व्हिएन्ना पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. व्हिएन्नात गेल्यावर ४४ टक्के भारतीय फोर स्टार हॉटेल, १९ टक्के फाईव्ह स्टार हॉटेल, तर २५ टक्के भारतीय थ्री स्टार हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. २०१५ साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये तब्बल ८९,६२८ भारतीयांनी भेट दिली. विशेष म्हणजे यात सर्वाधिक पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या आहे.

Leave a Comment