पोर्शने लॉन्च केल्या दोन महागड्या कार


नवी दिल्ली: भारतात आपल्या दोन स्पोर्ट्स कार ७१८ बॉक्स्टर आणि ७१८ केमॅन पोर्श या कंपनीने लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही कार्सची भारतात अनेक दिवसांपासून वाट बघितली जात होती. कंपनीने गेल्या वर्षी ह्या कार्स जगासमोर आणल्या होत्या. ७१८ बॉक्स्टर दोन सीट असलेली कंवर्टेबल आहे. तर ७१८ केमॅन ही कार हार्ड टॉप व्हर्जन आहे. या कार्सची अनुक्रमे भारतातील किंमत ८५.५३ लाख रूपये आणि ८१.६३ लाख रूपये ऐवढी आहे.

या कार्सच्या नव्या व्हर्जनमध्ये २.० लीटरचे ४ सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ३०० पीएसची पॉवर आणि ३८० एनएमचा टार्क देटे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत या कारमध्ये ३५ पीएसची जास्त पॉवर आणि १०० एनएमचा जास्तीचा टार्क मिळणार आहे.

आंतराराष्ट्रीय बाजारात या इंजिनसोबत ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅंडर्ड दिले गेले आहे. भारतात या इंजिनसोबत ७ स्पीड ड्य़ूल-क्लच ‘पीडीके’ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. या कारची टॉप स्पीड २७५ किमी प्रति तास इतका आहे, ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग मिळवण्यासाठी या कारला ४.७ सेकंद इतका वेळ लागेल. पोर्शचा दावा आहे की, जास्त स्पीडच्या व्यतिरिक्त हे इंजिन आधीच्या तुलनेत १३ टक्के जास्त मायलेज देणार आहे. स्टीअरींग आधीच्या तुलनेत अधिक जास्त रोस्पॉन्सिव आहे. जे जास्त वेगातही दिशा बदलण्यासाठी संतुलित राहते. यासोबतच या दोन्ही कार्समध्ये काही कॉस्मेटीक बदल बघायला मिळतात. यात ट्वीक्ड सस्पेंशन आणि लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आले आहे.

Leave a Comment