पॅनकार्ड बँक खात्याला न जोडल्यास बंद होऊ शकते तुमचे खाते!


नवी दिल्ली: तुमच्या बॅंक खात्यासोबत जर तुम्ही पॅनकार्ड जोडणी केली नसेल, तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. अजून २८ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ पॅनकार्ड जोडणीसाठी देण्यात आल्यामुळे जर तुम्ही अद्याप तुमच्या बँक अकाउंटला पॅनकार्ड जोडले नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या.

आयकर विभागाकडून बँक खात्याला पॅनकार्ड जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच ज्यांचे बॅंक खाते 28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डसह जोडलेले नसतील ते गोठवले जाऊ शकतात असे ही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. आयकर विभागाच्या निर्देशानंतर सर्व बॅंकांनी आपल्या ग्राहकांना २८ फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. जर कोणी पॅनकार्ड जोडले नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन ६० नंबरचा फॉर्म भरावा लागणार आहे. पण जर तुमचे अकाउंट हे जनधन अंतर्गत उघडण्यात आले असेल किंवा तुमचे अकाउंट झीरो बॅलेन्स असेल तर तुम्हाला पॅनकार्डची माहिती देणे बंधनकारक नसणार आहे.

Leave a Comment