अवघ्या ८ रुपयात व्होडाफोनचा नवा डाटा पॅक


नवी दिल्ली : व्होडाफोनने चेन्नईमध्ये रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपली नवी सुपरनेट ४जी सेवा नुकतीच लाँच केली असून या नव्या सुविधेमधून ग्राहकांना फक्त ८ रुपयांमध्ये ३०एमबीचा डाटा मिळणार आहे.

भारताच्या टेलिकॉम बाजारात मोठा ग्राहकवर्ग रिलायन्स जिओची ४जी सेवा लाँच झाल्यानंतर आत्तापर्यंत निर्माण झाला आहे. व्होडाफोन कंपनीने ८ रुपयात नवी डाटा ऑफर लाँच केल्यानंतर अधिकाधिक ग्राहकांचा कल ही सेवा मिळवण्याकडे गेला आहे. कंपनीकडून ही सर्व्हिस कोयंबटूर, तिरुपुर, मदुरे, तूतीकोरिन, तिरुचिरापल्ली, होसूर, सलेम, इरोड आणि पाँडिचेरीमध्ये लाँच करण्यात आली आहे.

Leave a Comment