‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहुर्तावर ‘गाढवाचे लग्न’!


बंगळूरु – दोन गाढवे जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बोहल्यावर चढले. दोन गाढवांचा विवाह नागरिकांनी मोठ्या उत्साहात लावून दिल्याची घटना घडली.

या विवाहासाठी कन्नड चळवळी पक्षाचे व माजी आमदार वेताळ नागराज यांनी पुढाकार घेतला होता. वधू गाढव म्हणून केम्पी व वर गाढव म्हणून केम्पा यांना सजवून कुबॉन पार्क येथे आणण्यात आले होते. दोन्ही गाढवांचे पाय एकमेकांना लावण्यात आले. विवाहानंतर त्यांना चुंबन घेण्यास भाग पाडले. विवाहानिमित्त जमलेल्या नागरिकांनी हातातील गुलाबाचे फुल देऊन गाढवांना शुभेच्छा दिल्या. या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Leave a Comment