पीएफच्या माध्यमातून तुम्ही बनू शकता करोडपती?


मुंबई – पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत नोकरदार वर्गाच्या दरमहा पगारातून काही विशिष्ट रक्कम जमा करण्यात येते. कर्मचा-याला आपल्या हक्काचा पीएफचा पैसा नोकरी सोडल्यानंतर कामी येतो. मात्र, अनेकांना हा पैसा कुठे आणि कशा प्रकारे गुंतविण्यात यावा याबाबत माहिती नसते. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही करोडपती बनाल.

एखाद्या संगठीत क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करता तर तुमच्याकडे करोडपती बनण्याची सुवर्णसंधी आहे. ईपीएफओ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना अशा कर्मचा-यांचा पीएफ सांभाळते. कर्मचारी प्रॉव्हिडेंट फंडावर ८.६५ टक्के व्याज देण्याची घोषणा ईपीएफओने केली आहे.

तुमचा बेसिक पगारापैकी १२ टक्के रक्कम ईपीएफप्रमाणेच पीएफ अकाऊंटमध्ये जाते. यासोबतच बेसिक पगारापैकी १२ टक्के रक्कम कंपनी आपल्याकडून कर्मचा-याच्या अकाऊंटमध्ये जमा करत असते.

सध्याच्या काळात ८.६५ टक्के रिटर्न मिळणे म्हणजेच खुप चांगली स्थिती आहे. यामध्ये कुठलाही धोका नाही. तसेच ईपीएफमध्ये जमा होणारा पैसा, व्याज आणि ईपीएफ फंडातून काढण्यात येणारी रक्कम यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही.

तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे तर तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागेल. कारण तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर तुम्ही निवृत्तीपूर्वी ईपीएफचा पैसा अकाऊंटमधून काढू शकणार नाहीत. जर तुम्हाला मधल्या काळात पैशांची गरज भासली तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदाही घेता येणार नाही.

नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करणे खुपच सोपे झालेले आहे. अशात तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे की नोकरी बदलताना तुमचा पीएफ अकाऊंट नंबरही ट्रान्सफर करुन घ्या.

Leave a Comment