जीपची नवी रँग्लर अनलिमिटेड लाँच


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी रँग्लर अनलिमिटेड ही पेट्रोल वेरियंट कार अमेरिकेची प्रसिद्धी वाहन निर्माता कंपनी जीपने भारतामध्ये नुकतीच लाँच केली आहे. या जीपमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहे.

या जीपमध्ये पेट्रोल वेरियंटचे ३.६ लिटर पेंटास्टार वी ६ इंजिन देण्यात आले आहे. २८५ बीएचपीचा पॉवर आणि ३५३ एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता आहे. यात ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या नव्या जीपमध्ये खास कमांड ट्रक ४ व्हिल ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आले आहे. या जीपमध्ये लेदर सीटस्, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, की-लेस एन्ट्री आणि ऑटो हँडलॅम्प्स देण्यात आले आहेत. या जीपची किंमत ५६ लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरुम) ऐवढी आहे.

Leave a Comment