जमिनीवर बसून जेवण्याची मजाच काही और!


सध्या होत असलेल्या आधुनिकीकरणासोबत लोकांच्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले असून पूर्वी जेवण्यासाठी खाली जमिनीवर मांडी घालून बसायचे. आता अनेकांच्या घरात डायनिंग टेबल स्थिरावला आहे. लोकांना लाईफस्टाईलच्या बदलामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जमिनीवर जेवायला बसण्याचे अनेक फायदे आहेत. ती स्टाईल नसून एक पचन प्रक्रिया आहे. मात्र अलिकडे लोक याकडे जुनाट आणि गावठी पद्धत म्हणून बघतात. पण जमिनीवर बसून जेवण्याचे काय आहेत फायदे हे जाणून घेऊ या!

जमिनीवर बसून जेवण कऱण्याचे अनेक फायदे असून पचनक्रिया यामुळे सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचते. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यास मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटासंबंधित विकारही दूर राहतात. शरीराच्या नसांचा थकवा मांडी घालून बसल्याने कमी होतो. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरात होणारा रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.

सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते. पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्ची वर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना आवश्यक नसतो त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जाते.

मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू ऍक्टिव्ह होतात त्यामुळॆ पचण्याची गती वाढते. जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येते. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही. जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात. योगासनांच्या या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असते आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहते. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.

यापासून अशाप्रकारे इतरही फायदे होतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की, आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया व यापासून मिळणाऱ्या विविध फायद्यांचा लाभ स्वतः साठी करून घेऊया.

Leave a Comment