‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी तुमचे दार ठोठावतेय


नवी दिल्ली – कालच एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडत अंतराळ संशोधनात भारताच्या अंतराळ संस्थेने म्हणजे ‘इस्रो’ने विश्वविक्रम केला. रशियाच्या नावे याआधीचा विक्रम होता आणि त्यांनीही एका वेळी फक्त ३७ उपग्रह अंतराळात सोडले होते. तर आपल्या संशोधनाने जगातील अनेक देशांना मागे टाकणाऱ्या ‘इस्रो’मध्ये नोकरीच्या अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत

पद:- शास्त्रज्ञ/इंजिनिअर, तरूण ग्रॅज्युएट्सना लेव्हल १०च्या हिशोबाने पगार दिला जाईल.

पुढील शाखांमध्ये इंजिनिअरिंग केलेल्यांसाठी नोकर भरती आहेत
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर – ४२
मेकॅनिकल इंजिनिअर – ३६
कॉम्प्युटर सायन्स- ९

किमान शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून ‘बी.ई.’ किंवा ‘बी.टेक.’ केलेले असावे.
या पदांसाठी वयाची मर्यादा ३५ वर्षे एवढी आहे. ७ मार्चपर्यंत उमेदावाराचं वय जास्तीत जास्त ३५ असावे. वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षेने या पदांसाठी उमेदवारांची निवड होईल. ही लेखी परीक्षा ७ मेला होणार असून अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, नवी दिल्ली, आणि तिरूअनंतपुरम् या १२ शहरांमध्ये होणार आहे.

पगार – महिन्याला ५६,१०० रू याप्रमाणे पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळेल. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता या isac.gov.in अधिकृत वेबसाईटवरून करू शकता. हा अर्ज भरताना १०० रूपये फी ऑनलाईन बँकिंगने भरायची आहे. १५ फेब्रुवारी ऑनलाईन अर्ज उपलब्ध होण्याची तारीख असून ७ मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ७ मे ला परीक्षेची तारीख आहे.

Leave a Comment