होय, मी परत येतोय!


स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकियाचे फोन कधी बाहेर फेकले गेले हे कळलेच नाही. नोकियाचे नाव भारतीय मोबाईल बाजारपेठेत मोठे होते. आजही मोबाईल क्षेत्रात रफ अँड टफ युज आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ असणारे फोन म्हणून या नोकियाच्या फोनचे उदाहरण दिले जायचे. नोकियाचे जुने हँडसेट आजही अनेकांकडे असतील. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे.

नोकिया ३३१० च्या रिलाँचींगची गॅझेट्स संदर्भातील अपडेट्स देणा-या पत्रकार इवान ब्लास यांनी बातमी दिली आहे. या कंपनीकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा या महिन्यात होईल असेही सांगितले. नोकिया ३३१० मध्ये कॅमेरा नसला की तरी दिर्घ बॅटरी लाईफ आणि टिकाऊपणा हे त्याचे वैशिष्ट होते. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हे फोन बाजारात आणणार असल्याची चर्चा आहे. स्मार्टफोनची बॅटरी लाईफ ही कमी असते त्यामुळे पर्याय म्हणून अशा मोबाईल धारकांना हे ३३१० हँडसेट वापरता येणार आहे. या हँडसेटची किंमत ४ हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment