रशियाचा विश्वविक्रम इस्त्रोने मोडला


चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून विश्वविक्रम केला असून इस्त्रोने पीएसएलव्हीच्या माध्यमातून तब्बल १०४उपग्रह अंतराळात सोडले. हा विक्रम आजवर केवळ रशियाच्याच नावावर होता. २०१४मध्ये एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडून रशियाने विश्वविक्रम केला होता. मात्र, भारताने रूसपेक्षा कितीतरी अधिक उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडून विश्वविक्रमावर आपले नाव कोरले आहे. या उपक्रमात १०१ छोटे उपग्रह होते. ज्यांचे वजन ६६४ किलोग्रॅम एवढे आहे.

अवकाशात एकाच वेळी इतके उपग्रह सोडने ही सोपी गोष्ट नसते. कारण, उपग्रह एकमेकांना धडकण्याची भिती असते. मात्र, भारतीय संशोधकांनी उपग्रहांची रचनाच अशी केली होती की, हा धोका निर्माण झाला नाही. सर्व उपग्रह एकाच वेळी यशस्वी रित्या अवकाशात झेपावले. हे उपग्रह प्रति तास २७ हजार किमी वेगाने अंतराळात सोडण्यात आले. या वेगाने सुमारे ६०० सेंकंदात १०१ उपग्रह उवकाशात सोडण्यात आले.

यापूर्वी जून २०१५मध्ये भारतात एकाच वेळी २३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्य़ा प्रयोगात तब्बल १०१ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. पीएसएलव्हीने २१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर १०३ सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून ५२० कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल. त्यांचे एकूण वजन ६६४ आहे. यातील ९६ उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.

Leave a Comment