भारतात स्मार्टफोन विक्रीत चिनी कंपन्यांचे वर्चस्व


गतवर्षात म्हणजे २०१६ मध्ये भारतीय बाजारात तब्बल १० कोटी ९१ लाख स्मार्टफोन विकले गेले असून गतवर्षीच्या तुलनेत ५.२ टक्के अधिक फोन विकले गेले आहेत. इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशनने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन सर्वाधिक संख्येने विकले गेल्याचे नमूद केले गेले आहे.

गतवर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजे आक्टोबर ते डिसेंबर या काळात २.५८ कोटी स्मार्टफोन विकले गेले. हा आकडा २०१५ इतकाच आहे आणि जुलै ते सप्टेबर या तिमाहीपेक्षा हा आकडा २०.३ टक्क्यांनी कमी आहे. फेस्टीव्ह सीझनमध्ये झालेली जोरदार विक्री पण नोव्हेबर मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे हा फरक पडला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. चिनी स्मार्टफोन विक्री चौथ्या तिमाहीत एकूण विक्रीच्या ४६ टक्के होती. स्थानिक उत्पादकांचा स्मार्टफोन विक्रीत १९.४, सॅमसंगचा २५ तर शाओमीचा वाटा १०.७ टक्के असल्याचेही या आकडेवारीत नमूद केले गेले आहे.

Leave a Comment