अवघ्या सहाव्या मिनिटाला मिळणार पॅन नंबर


आजमितीस पॅनकार्ड किती महत्वाचे हे आपल्या सर्वांच माहीत आहे, हे पॅनकार्ड मिळविण्यासाठी आपल्याला खूप घासाघीस करावी लागते. पण आता तुम्हाला अवघ्या ५ ते ६ मिनिटात तुम्हाला पॅनकार्ड मिळणार आहे. विश्वास बसत नाही ना… पण हे खरे आहे. पॅनकार्ड सोबतच तुम्ही तुमचा आयकर स्मार्टफोनच्या मदतीने भरणे शक्य होणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) आयकर भरणाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आधार ई-केवायसीचा वापर करणार आहे. ई-केवायसीच्या माध्यमातूनच एखाद्या व्यक्तीच्या पत्याची आणि इतर माहिती प्राप्त होते.

याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने छापले असून त्यांच्या वृत्तानुसार, जर ई-केवायसीच्या मदतीने सीम कार्ड दिले जाऊ शकते तर पॅनकार्ड पण दिले जाऊ शकते. ई-केवायसीच्या मदतीने पॅन नंबर ५ ते ६ मिनिटात दिला जाऊ शकतो आणि पॅनकार्ड त्यानंतर पाठविले जाऊ शकते. यासाठी सीबीडीटी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेयर्स यांनी एक करार केला असून त्यांच्या करारानुसार फक्त चार तासात पॅनकार्ड दिले जाऊ शकते.

त्याचबरोबर सीबीडीटी एक अॅप बनवत असून ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तुमचा आयकर भरू शकता. या अॅपच्या सहाय्याने तुम्ही पॅनकार्डसाठी देखील अर्ज करू शकता आणि आयकर परताव्याची माहिती देखील मिळवू शकता.

Leave a Comment