लग्झरी व्हॅन नाही, हे आहे चालतेफिरते ज्युवेलरी शॉप


गोल्डन रंगात रंगविलेली लक्झरी व्हॅन पाहून प्रथमदर्शनी ती कोणा अमीर उमरावाची अथवा सुपरस्टारची व्हॅनिटी व्हॅन असेल असा समज होऊ शकेल पण ही लग्झरी व्हॅन म्हणजे चालते फिरते ज्युवेलरी स्टोअर आहे. भारताचा प्रसिद्ध ऑटो डिझायनर दिलीप छाबडिया यांनी ते तयार केले आहे मात्र या व्हॅनची कल्पना अर्जेंटिनाचा महान फूटबॉलपटू दिअॅगो मॅरेडोना याची आहे.

मेरेडोना केरळच्या चम्मानूर ग्रुपचा बिझिनेस पार्टनर आहे. त्यांच्या बॉडी अॅन्ड मॅरेाडोना गोल्ड डायमंड कंपनीसाठी ही व्हॅन डिझाईन केली गेली आहे. त्याच्या डिझाईनची ऑर्डर भारतीय डिझायनर दिलीप छाबडिया यांना दिली गेली होती. मॅरेडोनाची कंपनी भारतात ज्युवेलरीचा रिटेल व्यवसाय सुरू करत आहे. त्यांचे हे पहिलेच चालते फिरते स्टोर आहे. या व्हॅनमध्ये आतून एसी लावले गेले आहेत तसेच सीसीटिव्ही कॅमेरेही बसविले गेले आहेत. व्हॅनला १२७०० सीसीचे इंजिन, १४ स्पीड गिअरबॉक्स दिली गेली असून तिची किमत आहे ४ कोटी५० लाख रूपये.

Leave a Comment