“रोबोटशी लग्न करण्याची वेळ जवळ आली आहे”


यंत्रमानव (रोबोट) माणसांचे अनेक कामे करत आहे, मात्र लग्न आणि शरीरसंबंध आतापर्यंत त्यांच्यापासून दूर होते. मात्र “रोबोटसोबत सेक्स आता सुरूच होणार आहे,” असा दावा एका तज्ज्ञाने केला आहे. लंडनमधील एका जागतिक परिषदेत हा दावा करण्यात आला आहे.

शरीरसुख पुरविण्याकरिता प्रोग्रॅम केलेला धातू, रबर आणि प्लॅस्टिक यांनी बनवलेला असा अॅनिमेटेड लव्हर काही महिन्यात समोर येईल, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.” रोबोटशी सेक्स आता सुरूच होणार आहे, पहिले सेक्सबॉट्स अत्यंत लवकर येतील…कदाचित पुढच्याच वर्षी,” असे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) तज्ज्ञ डेविड लेव्ही यांनी सांगितले. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये आयोजित इंटरनॅशनल काँग्रेस ऑन लव्ह अँड सेक्स विथ रोबोट्स या परिषदेत ते बोलत होते.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कंपनी अॅबिस क्रिएशन्स पुढच्या वर्षी अशा सेक्स रोबोटचा प्रचार सुरू करेल. या यंत्रमानवांमध्ये बिलकुल मानवांप्रमाणे बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता असेल. वर्ष 2050 पर्यंत लोक यंत्रमानवाशी लग्न करू लागतील, असे लेव्ही म्हणाले.

लेव्ही यांनी ‘लव्ह अँड सेक्स विथ रोबोट्स’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. लग्नाबाबत लोकांचे विचार वेगाने बदलत असून येत्या काळात अधिकाधिक लोक रोबोट्सशी सेक्स व प्रेम करू लागतील, असे ते म्हणाले.

Leave a Comment