दुबईत फ्लाईंग टॅक्सीची करा सैर


दुबईत येत्या जुलैपासून फ्लाईंग टॅक्सी सेवा लाँच केली जाणार असून या टॅक्सीच्या घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे प्रवासी ही टॅक्सी स्वतःच उडवू शकणार आहेत व अर्धा तास रिचार्जवर ती ५० किमीची सैर करू शकेल १ च प्रवासी बसण्याची सेाय असलेली ही टॅक्सी ड्रोन बनविणारी चिनी कंपनी इहांगने तयार केली आहे. या टॅक्सीचा उद्देश २०३० सालपर्यंत यूएई मध्ये सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्स्पोर्ट सिस्टीम पूर्णपणे वापरात आणणे हा आहे.

ही टॅकसी १ तासात १०० किमीचे अंतर कापू शकते व ती ३०० मीटर उंचीवरून उडते. अर्धा तास उडविण्यासाठी ती २ तास रिचार्ज करावी लागते. यात असा एक प्रोग्रॅम घातला गेला आहे की जेणेकरून प्रवासी ती सहज उडवू शकतील. त्यात प्रवाशाने आपले जाण्याचे ठिकाण व कुठे उतरायचे आहे ते स्थान निश्चत करावयाचे आहे. ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवरून या टॅक्सीवर नजर ठेवली जाणार आहे. या टॅक्सीला ८ प्रोपेलर आहे व सेन्सर च्या सहाय्याने टेंपरेचर कंट्रोल करता येते.

दुबईत फिरण्यासाठी जगातून दरवर्षी सरासरी दीड कोटी प्रवासी पर्यटक येतात. त्यांच्यासाठी फ्लाईंग टॅक्सी हे मोठेच आकर्षण असेल.

Leave a Comment