टीव्हीवर व्हिडीओ पाहण्यासाठी फेसबुक लॉन्च करणार अॅप


वॉशिंग्टन – स्मार्ट टीव्हीसाठी फेसबुक एक अॅप लॉन्च करणार आहे. ज्याच्या मदतीने सोशल मीडियाचा वापर करणारे आपले व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर पाहू शकतील.

फेसबुकने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, अॅपल टीव्ही, सॅमसंग स्मार्ट टीव्ही आणि अॅमेजन फायर टीव्हीसाठी एक अॅप लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. व्हिडीओवर स्क्रॉल केल्यावर आवाज आपोआप वाढेल आणि व्हिडीओवरून बाजूला केल्यास बंद केला होईल. पहिल्यांदा न्यूज फीडमध्ये व्हिडीओ विना आवाज सुरु व्हायचे.

वॉल स्ट्रीट जर्नलने मागील महिन्यात फेसबुक टीव्ही सेट टॉप बॉक्ससाठी एक अॅपची निर्मिती करीत आहे. ज्यामुळे कंपनी लाईव्ह व्हिडीओ आणि व्हिडीओ जाहिरातींच्या जवळ येईल अशी बातमी दिली होती. दरम्यान कंपनीने मागील वर्षी आपली लाईव्ह व्हिडीओ सेवा देण्यास सुरुवात केली होती.

Leave a Comment