अपोलो टू – ८ जीबी रॅमचा स्मार्टफोन


चिनी कंपनी व्हर्ना ने गतवर्षी अपोलो नावाने ६ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता अपोलो टू हा ८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१७ मध्ये लाँच केला जात असल्याची घोषणा केली आहे. ट्वीटरवर या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार हा जगातला पहिला हेलियो एक्स ३० प्रोसेसर असलेला स्मार्टफोन आहे.

अपोलो टू दोन व्हेरिएंटमध्ये येत आहे. एक ६ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरीसह आहे तर दुसरा ८ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल मेमरीसह आहे. या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलेला हेलियो एकस ३० प्रोसेसर गेल्या ऑगस्टमध्येच लाँच झाला होता. हा प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनना ४० एमपीचे फोटो काढू शकेल व ३४ एमपीचा व्हिडीओ शूट करू शकेल असा कॅमेरा सेन्सर लावता येतो. आणि त्यासाठी फोनची रॅम ८ जीबी असावी लागते. या फोनला क्यूएचडी डिस्प्ले दिला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी आसूसने ८ जीबी रॅमचा झेनफोन टू एआर स्मार्टफोन बाजारात आणत असल्याची घोषणा केली होती. हा फोन २०१७ च्या दुसर्‍या तिमाहीत मार्केटमध्ये येणार आहे.

Leave a Comment