सरकारने स्वस्त केले हृदयविकारावरील उपचार


नवी दिल्ली – सरकारने हृदयविकार असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देत स्टेंटच्या किमती जवळपास ८५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आता नव्या किमतीनुसार मेटल स्टेंट्स ७२६० रुपयांना तर बीव्हीएस (bioresorbable vascular scaffold) स्टेंट २९६०० रुपयांना मिळणार आहे.
राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए) ने जारी केलेल्या अधिसूचनेच या स्टेंटच्या किमती वरीलप्रमाणे ठरवल्याचे स्पष्ट केले आहे. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीत छोट्याशा नळीच्या आकाराचा हा स्टेंट बसवला जातो. या स्टेंटची बाजारातील किंमत ही २५,००० रुपयांपासून १.९८ लाखांपर्यंत होती. हॉस्पिटल या स्टेंटच्या माध्यमातून जवळपास ६५४ टक्के नफा कमवत होते, असे एनपीपीएच्या बेवसाईटवरील माहितीवरून स्पष्ट होते.

स्टेंट नफा कमावण्यासाठी अव्वाच्या सव्वा किमतीला विकण्यात येत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. पेशंट आणि डॉक्टरांमध्ये यावरून अनेकदा मतभेदही निर्माण होत होते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्टेंटच्या किमती ठरवणे अत्यंत गरजेचे होते, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तसेच अत्यावश्यक औषधींच्या राष्ट्रीय यादीमध्ये या कोरोनरी स्टेंट्सचा समावेश करण्यात आला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment