जिओला येणार ‘६’ सीरिजचा नंबर


मुंबई : दूरसंचार विभागाकडून रिलायन्स जिओला नव्या सीरिजचे नंबर देण्याची परवानगी मिळाली असून हा नंबर ‘६’ सीरिजचा असल्याची माहिती आहे.

६ सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी रिलायन्स जिओला दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच ६ सीरिजचे नंबर वितरीत केले जातील. जिओ सध्या मिळालेल्या परवानगीनुसार एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये ६००१०-६००१९, आसाममध्ये ६००३०-६००३९ आणि तामिळनाडूमध्ये ६००४०-६००४९ असा एमएससी कोड असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या सीरिजचे नंबर जिओने दिले तर ६ सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत ९, ८ आणि ७ या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment