एप्रिलपासून ऑनलाइन काढता येणार पीएफ


नवी दिल्ली – येत्या एप्रिल महिन्यापासून कर्मचारी भविष्‍य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य ऑनलाइन पीएफ काढू शकतात. यासाठी स्वतःच्या कंपनीत किंवा कार्यालयात पैसे काढण्याचा फॉर्म भरण्याची गरज नसल्यामुळे ईपीएफओच्या जवळपास १७कोटी सदस्यांना फायदा होणार आहे.

ऑनलाइन पीएफ काढण्यावर ईपीएफओ काम करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून ईपीएफओच्या कार्यालयांना यासाठी सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन एप्रिलपासून ऑनलाइन पीएफ काढण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे.

ही सेवा सुरू झाल्यावर ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सध्या पीएफ काढण्यासाठी पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तो कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटकडे जमा करावा लागतो. नंतर तो फॉर्म ईपीएफओ कार्यालयात जातो, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो, मात्र ऑनलाइऩ सेवा सुरू झाल्यास त्वरित पीएफ काढता येऊ शकतो.

Leave a Comment