होंडा सिटीची नवी फेसलिफ्ट कार लाँच


मंगळवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होंडा सिटी फेसलिफ्ट ही कार लाँच केली आहे. ग्राहक या गाडीची बुकिंग सुरू होण्याअगोदरच होंडाच्या डिलरशिपजवळ जाऊन २१ हजार रुपयांत ही होंडा सिटी फेसलिफ्ट बुकिंग करू शकता. या गाडीची झलक कंपनीने भारतीय बाजारात दाखवली आहे. होंडा २०१४ नंतर आता एका नव्या अवतारात या कारला लाँच करत आहे. विशेष म्हणजे १९९८ मध्ये होंडा सिटीला सर्वात अगोदर लाँच केले होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने ग्राहकांच्या पसंतीचा मान मिळवला आहे.

होंडा सिटी फेसलिफ्ट वर्जन सर्वात अगोदर चीनमध्ये लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत या कारचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. होंडा सिटी रियरकडे पाहिले तर एलईदी इंसर्टसोबत टेललॅंप लावले आहेत. कारच्या रियर बंपरमध्ये देखील खूप बदल केलेला आपल्याला दिसतो. साइड प्रोफाइलप्रमाणे हे मॉडेल आहे. मात्र या कारमध्ये १५ इंच एलॉय व्हीलच्या जागी यावेळी १६ इंच एलॉय व्हील लावले आहेत. आतापर्यंत इंटिरियरला घेऊन कोणताच खुलासा झालेला नाही.

मात्र या कारमध्ये एंड्रॉयड ऑटो आणि मोबाइल मिररिंग अॅपसोबत इनफोटेनमेंट सिस्टम लावलेले आहे. यासोबतच स्टॅंटर्ड फिचरमध्ये या कारमध्ये ६ एअरबॅग्स दिले आहेत. त्याचबरोबर याचे ग्राऊंड क्लियरेंस १० एमएमने वाढवण्यात आले आहे.

पावर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर २०१७ होंडा सिटीच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये होंडा सिटीच इंजिन मिळू शकते. या कारमध्ये १.५ लीटर ४ सिलेंडर i-VTEC पेट्रोल इंजिन दिले आहे. ज्यामध्ये ११७बीएचपी आणि १४५ एनएमचे टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच १.५ लीटर i-DTEC डीझेल इंजिन ऑप्शन १००बीएचपीची ताकद आणि २०० एनएम टॉर्क देणार आहेत. पेट्रोल इंजिनला ५ स्पीट गिअरबॉक्स आणि सीव्हीटीसोबत लॅस केले आहे आणि डिझेल इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा कमी केले आहे.

Leave a Comment