स्कोडा येत्या कांही आठवड्यात ऑक्टेव्हियाची लिमिटेड एडिशन भारतात सादर करणार असून या मॉडेलच्या २०० कार्स विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. लिमिटेड एडिशनसाठी कांही नवी फिचर्स अॅड केली गेली आहेत. त्यात अॅलॉय व्हील, विंग मिरर व इंटिरियरमध्ये बदल केले गेले आहेत.
स्कोडा लिमिटेड एडिशन ऑक्टेव्हीया भारतात आणणार
ही लिमिटेड एडिशन ब्लॅक एडिशन असेल असे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही एडिशन यापूर्वी विकली गेली आहे. पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ती असेल. त्यात पेट्रोलसाठी १.८ लिटरचे तर डिझेलसाठी २.० लिटरचे इंजिन दिले जाईल. बाय झेनॉन हेडलँप, एलईडीआरएल, पॅनोरेमिक सनरूफ, एलसीडी टचस्क्रीन, इंफोटेनमेंट,६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रीकली अॅडजस्ट होणारी ड्रायव्हरसीट अशी अन्य फिचर्स असतील.
स्कोडा भारतात त्यांची सर्वात महत्त्वाची कोडीअॅक ही लवकरच लाँच करणार आहे त्याचबरोबर भारतात वेगाने बाजार काबीज करण्यासाठी त्यांची मोंटेकार्लो कारही सादर करणार आहे.