बंगलोरमधली फेमस रेड अॅन्ड व्हाईट फॅमिली


सर्वसामान्य गर्दीत आपले काही तरी वेगळेपण दिसावे व त्यामुळे आपण चटकन नजरेत भरावे अशी अनेकांची इच्छा असते. गर्दीचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या त्यासाठी वापरल्या जातात. यात महिलावर्ग आघाडीवर असतो असाही दावा केला जातो. केस वेगळ्याच रंगांनी रंगविणे, डोळ्यात भरेल अशी वेशभूषा करणे असेही प्रकार केले जातात. बंगलोर मधील एक कुटुंब मात्र आणखीनच वेगळ्या फंड्यामुळे देशभरात प्रसिद्धीस आले असून या कुटुंबाला रेड अॅन्ड व्हाईट फॅमिली म्हणून ओळखले जाते.

कुटुंबप्रमुख सेवनराज व त्यांचे कुटुंब कपड्यांसह त्यांच्या वापरातील सर्व वस्तू लाल व पांढर्‍या रंगाच्या कॉबिनेशनमध्ये वापरतात. सेवनराज हे यशस्वी उद्योजक आहेत. मात्र ५२ वर्षीय सेवनराज यांना पैसा व प्रतिभा यामुळे फार ओळख मिळत नाही असे मनोमन वाटते. आपल्याला व आपल्या कुटुंबाला कांहीतरी वेगळी ओळख मिळावी यासाठी त्यांनी रेड अॅन्ड व्हाईट संकल्पना वापरली आहे. यात दात घासायच्या टूथब्रशपासून ते मोबाईल, कार्स, घराच्या भिंती, ऑफिसचे इंटिरियर त्यांनी लाल पांढर्‍या रंगात केले आहे. या कलर कोड मुळे ते कुठेही गेले तरी त्यांना लोक सहज ओळखतात.

त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा यांनीही हा कलर कोड स्वीकारला आहे. सेवनराज म्हणतात म.गांधी यांची ओळख गोल भिंगाचा चष्मा व पांढरे वस्त्र यामुळे होती. त्यावरूनच मी प्रेरणा घेतली. सेवनराज सांगतात त्यांच्या वडिलांच्या कुटुंबातले ते सातवे मूल. म्हणून त्यांचे नांव वडिलानी सेवन ठेवून जन्मापासूनच त्यांना वेगळी ओळख दिली होती. तरूणवयात केस वाढवून आपली वेगळी ओळख निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न अ्रयशस्वी ठरला मात्र त्यांचा कलरकोड चांगलाच यशस्वी ठरला.

सेवन यांच्या आयुष्यात सात नंबरचेही विशेष स्थान आहे. त्यामुळे त्यांचे मोबाईल, कार नंबर्स यात शेवटचा आकडा सात असतो इतकेच नव्हे तर सेवन यांच्या कोटावरही सात नंबर असतो.

Loading RSS Feed

Leave a Comment