पाकिस्तानात भारतीय चित्रपट


भारतीय हिंदी चित्रपट पाकिस्तानात फार लोकप्रिय आहेत कारण पाकिस्तानच्या लोकांना हे चित्रपट पाहताना पाकिस्तान आणि भारत यांच्यात काहीच फरक नाही याचा अनुभव येत असतो. मात्र काही वेळा पाकिस्तानी शासकांना भारतीय आणि पाकिस्तानी जनता यांच्यात वितुष्टाचे वातावरण तयार करण्याची गरज पडते तेव्हा ते भारतातल्या चित्रपटांना पाकिस्तानात बंदी घालतात. आता जग एवढे जवळ आले आहे की, अशा प्रकारची बंदी व्यवहार्य ठरत नाही. सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही पाकिस्तानात भारतातल्या चित्रपटांच्या चित्रफिती कोणत्या ना कोणत्या मार्गांनी पोचतच असतात. तरीही पाकिस्तान सरकार आपला भारतीय चित्रपटावरचा राग काढण्याचा प्रयत्न करीत असतेच.

काही वेळा भारतालाही पाकिस्तानी अभिनेते किंवा कलाकार यांच्यावर बंदी घालून पाकिस्तानला उत्तर द्यावेच लागते. मग भारत सरकार पाकिस्तानातल्या कलाकारांवर बंदी घालते. गेल्या वर्षाभरात पाकिस्तानने काश्मीर मध्ये सातत्याने हल्ले केल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने पाकिस्तानल्या कलाकारांवर भारतीय चित्रपटांत काम करण्यासाठी बंदी घातली होती. आता वातावरण निवळू लागले आहेच पण अमेरिकेचे अध्यक्ष रोनॉल्ड ट्रम्प यांच्या दणक्यानेही पाकिस्तान काही प्रमाणात सरळ वागण्याचे नाटक तरी करीत आहे. पाकिस्तानने भारतातल्या दोन चित्रपटांना त्या देेशात परवानगी दिली आहे. त्यातला पहिला चित्रपट आहेे हृतिक रोशनाचा काबील आणि दुसरा आहे शुजित सरकारचा रनिंगशाहदी डॉट कॉम. गेल्या एक तारखेपासून पाकिस्तानने हा निर्णय घेतला असून तेव्हा पासून या दोन चित्रपटांना अनुमती दिली आहे.

आता भारतातल्या काही चित्रपट निर्मात्यांनी आणि कलाकारांनी, भारत सरकारने पाकिस्तानच्या या निर्णयाला अनुकूल प्रतिसाद द्यावा आणि पाकिस्तानी अभिनेत्यांवर घातलेली भारतातली बंदी उठवावी असे आवाहन केले आहे. अर्थात पाकिस्तानच्या अशा निर्णयात फार प्रामाणिकपणा असतोंच असे नाही. केवळ दोन चित्रपटांना अनुमती दिली याचा अर्थ पाकिस्तानचे शेपूट सरळ झाले असे म्हणता येत नाही. चांगले संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची खरेच इच्छा असेल तर अनेक मार्गांनी ती व्यक्त व्हायला हवी आहे. त्याबाबत पाकिस्तानकडून काही हालचाल होत नाही. कदाचित भारतीय चित्रपटांना अनुमती देण्यात पाकिस्तानची अपरिहार्यताही असेल.

Leave a Comment