मुंबई – पायरसीविरोधातील आपला गुगलने लढा अधिक तीव्र करत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून याबाबत टॉरंटफ्रीकने दिलेल्या वृत्तानुसार हॉलिवूडमधील प्रतिनिधींकडून पायरसीला प्रोत्साहन दिले जात असल्याने गुगलवर टीका होत होती. त्यामुळेच गुगलने हॉलिवूडमध्ये चालणाऱ्या पायरसीवर निशाणा साधत टॉरंट वेबसाईटवर बंदीचा निर्णय घेतला आहे. टॉरंट बेवबसाईट्सचा सामना करण्यासाठी फक्त गुगलनेच पुढाकार घेतला नसून गूगलसोबतच बिंग, याहू, यासारख्या सर्च इंजिनकडूनही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्यात येणार आहे.
टॉरंट वेबसाईट्सवर बंदी आणणार गुगल
नुकतीच यासंबंधी ब्रिटनमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत गुगल, याहू, बिंग आणि हॉलिवूडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सध्या फक्त ब्रिटनमध्येच गुगल कारवाई करत टॉरंट वेबसाईट्स आणि सर्व्हरवर बंदी घालणार आहे. त्यानंतर हळू हळू जगभरात ही कारवाई करण्यास सुरुवात होईल. बैठकीतील सर्व मुद्दे जाहीर करण्यात आले नसले तरी १ जून २०१७ पासून या वेबसाईट्स वापरता येणार नाहीत. त्यामुळे जगभरातील टॉरंट वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे.