इस्रोच्या विक्रमाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू


बंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकाच क्षेपणास्त्रातून १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे नवा विक्रम रचण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून, एकूण २८ तास शिल्लक आहेत.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १५ फेब्रुवारीला ‘पीएसएलव्ही-सी३७’ या क्षेपणास्त्रातून एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलार उपग्रह लाँच व्हेहीकलच्या मदतीने एकूण ७१४ किलोग्रॅम वजन असलेले कार्टोसेट-२ श्रेणीतील उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी अवकाशात सोडण्यात येणार आहे. यासोबत १०३ उपग्रह सुद्धा अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या १०३ उपग्रहांचे एकूण वजन ६६४ किलोग्रॅम असणार आहे. ‘मंगलयान मोहीम’ व ‘जीएसएलव्ही’ च्या यशामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश क्षेत्रात इस्रोच्या प्रतिष्ठेत वाढ झाली आहे. अनेक देश उपग्रह सोडण्यासाठी इस्रोचे सहकार्य घेत आहेत.

Leave a Comment