रिलायन्स जिओ सिनेमा- युजर्सना जिओची भेट


ग्राहकांना फ्री सेवा कॉल डेटा देऊन खूष केलेल्या रिलायन्स जिओने चित्रपट रसिकांसाठीही शानदार भेट दिली आहे. जिओच्या ३१ मार्च पर्यंतच्या फ्री डेटा योजनेअंतर्गत प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळत असलेल्या युजर्ससाठी कंपनीतर्फे अपडेटेड जिओ सिनेमा अॅप डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे ऑफलाईन मोडमध्येही सिनेमा पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

अर्थात चित्रपट मोठा असेल तर १ जीबी डेटा संपून जाण्याची शक्यता आहे मात्र स्मार्ट डाऊनलोड फिचर नुसार रात्री दोन ते पाच या काळात डाऊनलोड शेड्युल मध्ये अनलिमिटेड डेटा डाऊनलोड करता येणार आहे. हा हॅपी अवर्समधला डाउनलोड १ जीबीचा रेग्युलर डेटा व्यतिरिक्त आहे. शिवाय १ जीबी डाऊनलोड मर्यादा संपली तरी फोर जी स्पीड इंटरनेट मिळणार आहे. अर्थात त्यासाठी बूस्टर पॅक घ्यावा लागेल. त्याचा रेट १ जीबी साठी ५१ रूपये असून ६ जीबी साठी ३०१ रूपये आहे. जिओ युजर्स त्यांचा आवडता चित्रपट इंटरनेट शिवाय डाउनलोड करू शकणार आहेत.

Leave a Comment