इटलीच्या प्रसिद्ध पिओजिओ ने भारतात एप्रिलिया ब्रँडखाली दुसरी एप्रिलिया एसआर १५० रेस स्कूटर पेश केली असून तरूणाईला डोळ्यासमोर ठेवून या स्कूटरला फंकी लूक दिला गेला आहे. दिसायला अत्यंत आकर्षक असलेल्या या स्कूटरची एक्स शो रूम किंमत ६५ रूपये आहे. सहा महिन्यांपूर्वीच या कंपनीने त्यांची एप्रिलिया १५० ही स्कूटर भारतात आणली होती व त्याला मिळालेला चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन नवी फंकी लूकची स्कूटर आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता असे वरीष्ठ अधिकारी म्हणाले.
पिआजिओने आणली फंकी एप्रिलिया एसआर १५० स्कूटर
या स्कूटरला पॉवरफुल बनविण्यासाठी अनेक नवीन फिचर्स दिले गेले आहेत. रेस एडिशनसाठी १५४.८ सीसीचे तीन व्हॉल्व्ह,एअरकूल्ड, सिगल सिलेंडर इंजिन सीव्हीटी ट्रान्समिशनसह दिले गेले आहे. ही स्कूटर प्रतिलिटर ३५ ते ४० किमीचे मायलेज देईल व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ११५ किमी. या स्कूटरमध्ये अनेक रंगांचा वापर केला असून ग्राफिकचे सहाय्य त्यासाठी घेतले गेले आहे. युवा वर्गासाठी ही स्टायलिश स्कूटर आकर्षण ठरेल असा कंपनीचा दावा आहे.