जगातील पहिल्या गर्भनिरोधक अॅपला ब्रिटन सरकारची मंजुरी


लंडन – पहिल्यांदाच ब्रिटन सरकारने गर्भनिरोधक अॅपला मान्यता दिली असून या अॅपकडे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

याबाबत हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटन सरकारच्या ‘मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी’कडून ‘नॅचरल सायकल’ नावाच्या या अॅपला परवानगी मिळाली आहे. हे अॅप पारंपारिक गर्भनिरोधकापेक्षाही ९९ टक्के उत्तम कार्य करत असल्याचे सांगितले जात आहे.

या अॅपच्या वापरासाठी महिलेला रोज सकाळी आपल्या जीभेखालील तापमान नोंदवणे गरजेचे आहे. त्यानंतर तापमानाची नोंद या अॅपमध्ये करावी. त्यानुसार महिला गर्भवती राहण्याची किती शक्यता आहे हे अॅप सांगेल. म्हणजे ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल त्यादिवशी सेक्स केल्यास महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता फार कमी असते. पण जर अॅपने लाल रंग दाखवला तर महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता दाट असते आणि सुरक्षापुर्वक सेक्स करावा अशी सुचना त्या महिलेला मिळते.

१६१ देशातील १ लाख ५० हजार स्त्रिया सध्या या अॅपचा वापर करत असल्याची माहिती आहे. नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉक्टर राउल शेरवित्ज आणि त्यांची पत्नी एलिना बेर्गलुंड यांनी हे अॅप डेव्हलप केले आहे. २०१३ मध्ये हिग्स बोसॉन पार्टिकलाचा शोध घेण्याबद्दल दोघांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment