घालून पहा एसी जॅकेट


स्टाईल व टेक्नॉलॉजीने सजविलेले कपडे ही आत्तापर्यंत परदेशी कंपन्यांची मक्तेदारी होती मात्र भारतात प्रथमच पूर्ण स्वदेशी मेकचे असे एसी जॅकेट बाजारात आले आहे. बिहारमधला नवादा येथील खानवा खादी भंडारात हे जॅकेट उपलब्ध असून हे जॅकेट हिवाळ्यात गरम करता येते तर उन्हाळ्यात थंड ठेवता येते. लघुउद्येाग राज्यमंत्री गिरीराजसिंह यांनी यासंदर्भातली माहिती ट्वीटवर दिली आहे.

या जॅकेटच्या खिशात एक क्लायमेट कंट्रोल गिअर रिमोट दिला गेला आहे. एमआयटीच्या क्रांता या विद्यार्थ्याने क्लायमेट गिअर टेक्नॉलॉजीचा वापर करून तो तयार केला आहे. हे जॅकेट अंगात घातल्यानंतर उकडत असेल तर या गियर रिमोटच्या सहाय्याने जॅकेट थंड करता येते याउलट हिवाळ्यात थंडी वाजत असेल तर याच रिमोटच्या सहाय्याने जॅकेट गरम करून उब मिळविता येते. मेक इन इंडिया अंतर्गत हा रिमोट विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. केंद सरकार देशात खादी विक्री वाढावी यासाठी अनेक योजना आखत आहे. हे जॅकेट खादी विक्रीला किती चालना देते हे पाहणेही त्यामुळे मनोरंजक ठरणार आहे.
——

Leave a Comment