न्यायाधीशांच्या गाण्यामुळे जोडप्यांनी बदलला घटस्फोटाचा निर्णय - Majha Paper

न्यायाधीशांच्या गाण्यामुळे जोडप्यांनी बदलला घटस्फोटाचा निर्णय


खंडावा: मध्यप्रदेशातील न्यायालयात एका जनसुनावनी दरम्यान न्यायाधिशांनी चक्क मिळून एक गाणेच म्हटले. या गाण्याच परिणाम असा झाला की, अनेक जोडप्यांनी चक्क घटस्फोटाचा निर्णय बदलला. घटस्फोटासाठी केलेले अर्ज त्यांनी मागे घेतले. या प्रसंगानंतर न्यायाधीशांच्या गाण्याने वाचवले अऩेकांच संसार अशी चर्चा सुरू झाली.

याबाबतचे वृत्त न्यूज १८ च्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिले असून या वृत्तानुसार हा प्रसंग मध्य़प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील नॅशनल जनसुनावनी दरम्यान घ़डला. अनेक खटले येथे सुनावणीसाठी आले होते. या सर्व खटल्यांची सुनावणी खांडवाचे डीजे आणि कौटुंबिक न्यायाधीश करत होते. एकाच वेळी जर एवढे संसार तुटत असतील तर, समाजात योग्य संदेश जाणार नाही, असे वाटल्याने तसा निर्णय देणे न्यायाधीशांना ठिक वाटले नाही. यावर त्यांनी एक युक्ती केली.

सुनावणीला सुरूवात होतानाच न्यायाधीशांनी सर्व जोडप्यांना घटस्फोटाच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले. तसेच, तुम्ही पुन्हा एकदा आपसात बोलून घ्या कदाचित या बोलण्यामुळे तुमचा निर्णय बदलू शकतो, असेही सांगितले. या वेळी न्यायाधीशांनी घटस्फोटामुळे होणाऱ्या नुकसानाबद्धलही सांगितले. तसेच, प्रेमाणे जर एकत्र राहिले तर जीवन कसे आनंदी होऊ शकते हेही सांगितले.

दरम्यान, इतके सगळे होऊनही काही जोडपी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि एकमेकांशी भांडूही लागली. यावर न्यायाधीशांनी चक्क न्यायालयातच रोमॅंटीक गाणे गाण्यास सुरूवात केली. न्यायाधीशांनी गायलेले रोमॅंटीक गाणे ऐकून निर्णयावर ठाम असलेली जोडपी पुन्हा खुश झाली. त्यांनी पुन्हा एकदा घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. न्यायाधीशांच्या आदेशाने न्यायालयातच पुष्पहार मागवण्यात आले. हे हार सर्व जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात घातले आणि पुन्हा एकदा जीवन एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीशांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment