हिंदूस्तान मोटर्सच्या ‘अॅम्बेसेडर’ हक्क फ्रेंच कंपनीकडे


नवी दिल्ली : तब्बल ८० कोटी रुपयांना भारतातील प्रसिद्ध बिर्ला ग्रुपच्या मालकीच्या हिंदुस्तान मोटर्सची शानदार कार ‘अॅम्बेसेडर’ विकली गेली आहे. ‘अॅम्बेसेडर’चे हक्क फ्रेंच कार कंपनी पूजो (pegeot)ने खरेदी केले आहेत.

२०१४ साली ‘अॅम्बेसेडर’ या कारचे उत्पादन बिर्ला ग्रुपने थांबवले होते. एक दशकापूर्वी भारताच्या पंतप्रधानांपासून ते सामान्य ग्राहकांसाठी असलेल्या या कार मोठ्या मानाच्या समजल्या जायच्या. याबाबत सी के बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान मोटर्सने आपला ब्रॅन्ड आणि ट्रेडमार्क ‘अॅम्बेसेडर’ला ८० कोटी रुपयांना विकले असून या व्यवहारानंतर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत रक्कम आणि इतर देणे देण्यात येईल.

सात दशकांपूर्वी ‘अॅम्बेसेडर’ ब्रॅन्डला भारतात लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी, हिंदुस्तान मोटर्सने मॉरिस ऑक्सफर्ड सीरीज II (लँन्डमास्टर)ला काही बदलांसहीत नव्या अवतारात सादर केले होते. ही कार १९८० पर्यंत ‘मारुती’ बाजारात दाखल होईपर्यंत भारतीय बाजारातला हुकुमी एक्का ठरला होता. मागणी कमी झाल्यानंतर २४ मे २०१४ रोजी हिंदुस्तान मोटर्सने उत्तरपारा प्लान्टमधील आपले उत्पादन बंद केले होते.

Leave a Comment