सॅमसंग फोल्डेबल मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये दिसणार


सॅमसंगच्या गॅलेक्सी एक्स फोल्डेबल स्मार्टफोनसाठी आता फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण हा फोन मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस २०१७ मध्ये सादर केला जात असल्याचे कोरियन वेबसाईट इटीन्यूज ने म्हटले आहे. गेले कित्येक दिवस सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असल्याची चर्चा जोरात सुरू होती व या फोनसाठी अनेक पेंटंट सॅमसंगने घेतल्याची चर्चाही होती.

गिझ्मोचीन वेबसाईटने या फोनचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार सॅमसंगचा हा गॅलेक्सी एक्स फोडेल्बल स्मार्टफोन आत बाहेर कसाही फोल्ड होऊ शकणार आहे. तेा मिनी संगणक अथवा टॅब्लेट प्रमाणे असून अनफोल्ड केल्यावर तो ७ इंची पॅनलमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. वायरलेस की बोर्डसह तो येईल म्हणजेच तो लॅपटॉपसारखाही वापरता येणार आहे. कंपनीने या फोनची १० लाख युनिट तयार केली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment