देशपातळीवर होणार इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी एकच परीक्षा


नवी दिल्ली – देशपातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी होणा-या नीट प्रवेशपरिक्षेच्या धर्तीवर आता इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठी एकच प्रवेशपरिक्षा होणार आहे. ही प्रवेशपरिक्षा पुढच्यावर्षी २०१८ पासून सुरु होईल. केंद्र सरकारने इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठीच्या प्रवेशपरिक्षेच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे.

प्रस्तावाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामागचा उद्देश डोनेशनचा प्रभावी कमी करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात एकसमानता आणणे हा आहे. यामध्ये आयआयटीचा समावेश केलेला नाही. आयआयटीची स्वतंत्र प्रवेश परिक्षेची प्रक्रिया सुरु राहिल.

त्याचबरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रवेश प्रक्रिया राबवताना एआयसीटीईला भाषेची विविधता लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. नीट प्रमाणे इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरची प्रवेश परिक्षा वेगवेगळया भाषांमध्ये होईल असे एआयसीटीईमधील सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment