मुंबई – युवावर्गासह सर्वांकडूनच अॅक्टिवाला पसंती मिळत आलेली आहे. एक मजबूत वाहन असलेल्या अॅक्टिवाचे नवीन मॉडेल लॉन्च झाले आणि त्याची चर्चा झाली नाही, असे कधीही होणार नाही. भारतात सर्वाधिक विकणार्या होंडा अॅक्टिवाचे कंपनीने अॅक्टिवा-125 हे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. या नवीन अॅक्टिवाला आकर्षक अशा स्टाईलचा लुक देण्यात आला आहे. तसेच वाहन क्षेत्रातील ही पहिली ऑटोमेटेड स्कूटर असून जी ऑटोमॅटिक हेड लँपची सुविधा आहे.
होंडाची नवीन अॅक्टिव्हा १२५ लॉन्च
नवीन अॅक्टिवा-125 ही फ्रांटेस्टिक स्टाईल, नवी एलईडी पोजीशन लाईट्स आणि क्रोम चेस्टसह अलाय वॅरिएंट फीचर्स आहेत. येत्या वर्षात नवीन अॅक्टिवा-125 बाजारात आपले स्थान आणखीन पक्के करत सर्वाधिक विकणार्या स्कूटरच्या यादीत समाविष्ट होणार आहे. नवीन अॅक्टिवा-125मध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट असून तिचा फ्रंट हुक स्टाईलचे एयस्ट्रा स्टोरेजही देईल. होंडाच्या ही नवीन अॅक्टिवामध्ये कामबी ब्रेक सिस्टम फीचर्स असल्याने चालकास ब्रेकिंग डिस्टेंस आणि बॅलेन्स करता येणार आहे. यामुळे चालकाचा स्टूकर चालवितानाचा सेल्फ कॉन्फिडेंस वाढणार आहे.