बॅटरीवर चालणारी एकचाकी बाईक


दुचाकी बाईक क्षेत्रात उत्पादक कंपन्या नित्यनूतन मॉडेल्स प्रदर्शित करत असतानाच पेट्रोलची गरज नसलेली व इलेक्ट्रीकवर चालणारी एक चाकाची बाईक सध्या चर्चेत आली आहे. ही सिंगल व्हिल बाईक बॅटरीवर चालते. राईनो असे तिचे नामकरण केले गेले असून राईड यूवर न्यू ऑपरट्यूनिटी कंपनीने ती तयार केली आहे. या बाईकचे व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

ही बाईक आपल्या नेहमीच्या सायकलच्या लांबीच्या अर्धीच आहे. तिला २५ इंच व्यासाचे एकच चाक आहे व यावरून एकच व्यक्ती प्रवास करू शकते. या बाईकसाठी जादा मशीनरी वापरली गेलेली नाही. ख्रिस्तोफर हॉपमन व टोनी ओजमॅलिक यांनी मिळून ती तयार केली आहे. हॉपमनला या बाईकची कल्पना त्याच्या मुलीमुळे मिळाली. त्याची १३ वर्षीय मुलगी खूप व्हिडीओ गेम खेळत असे. त्यातून तिने नॅपकीनवर एक चाकी बाईकचे अर्धेमुर्धे स्केच तयार केले व ते हॉपमनला खूपच भावले. त्यानंतर त्याने त्यावर ७ वर्षे संशोधन करून ही बाईक तयार केली. ही बाईक यशस्वी झाली तर जगासाठी ती चांगली भेट ठरेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment