पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया


प्रत्येकालाच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज असतेच. पण तो कसा मिळवावा याची माहिती अनेकांना नसते. तुम्हाला पासपोर्ट कसा मिळवायचा याची माहिती आज आम्ही देणार आहोत. विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट आणि व्हिसा वकीलात विभागाकडून भारतीय नागरिकांना भारतीय पासपोर्ट देण्याची जबाबदारी पार पाडली जाते. देशभरातील तीस ठिकाणांहून आणि विदेशातील १६३ केंद्रांमधून भारतीय नागरिकांना पासपोर्ट प्रदान केले जाते. आता तर ही प्रक्रिया आणखीनच सुलभ करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या वेबसाईटवर पासपोर्ट देण्यासंबंधीची सगळी माहिती प्राप्त करता येते. भारतात असलेल्या सगळ्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये पासपोर्टची ऑनलाईन स्थिती काय आहे याची माहिती दिली जाते. आपण भरलेल्या पावतीवर असलेला फाईल संदर्भ क्रमांक दिल्यास, आपण पासपोर्ट अर्जाची स्थिती तपासू शकतो. अर्जदाराच्या काही तक्रारी असल्यास, त्या ऑनलाईन दाखल करण्याच्या सुविधेचाही लाभ घेता येतो.

नवीन पासपोर्टसाठी अर्ज करताना किंवा पासपोर्ट पुन्हा एकदा मिळविण्यासाठी किंवा हरविलेल्या आणि खराब झालेल्या पासपोर्टऐवजी दुसरा पासपोर्ट मिळविण्याचा अर्ज करताना, संबंधीत पासपोर्ट निवेदन, पत्र कोणत्याही पासपोर्ट केंद्रातून किंवा नियोजित स्पीडपोस्ट केंद्रातून किंवा तुमच्या शहरातील कोणत्याही नियोजित ठिकाणावरून घेता येते. भारत सरकारच्या वेबसाईटवर संबंधित विभागावर क्लीक करूनही पासपोर्ट आवेदन पत्र डाऊनलोड करता येते.

काळजीपूर्वक भरलेल्या आवेदनपत्रासोबत निवासाचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, व्यक्तिगत विशिष्ट तपशील (लागू असल्यास) ना हरकत प्रमाणपत्र (शासनाच्या सार्वजनिक विभागातील वेतनधारकांसाठी), आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक दस्तऐवज पासपोर्ट कार्यालयाचे काऊंटर, स्पीडपोस्ट केंद्र, जिल्हा पासपोर्ट केंद्र आणि पासपोर्ट संग्रह केंद्र यापैकी एखाद्या ठिकाणी सादर करावा. अर्जदार सध्या ज्या कार्यक्षेत्रात निवास करत आहे, त्यानुसार हे ठरविले जाते.