नववर्षातील पहिले ग्रहण आज


इंदौर – नववर्षातील ग्रहणांच्या खगोलीय घटनांची सुरूवात आजपासून (दि. 11 फेब्रुवारी) होणार्‍या चंद्रग्रहणाने होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार
आहे. उज्जैन येथील जीवाजी वेधशाळाचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्ता यांनी भारतीय कालगणनाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार सांगितले की,
शुक्रवारी चंद्रग्रहणाचा प्रारंभ सायंकाळी चार वाजून 2 मिनीट 2 सेकंदापासून होणार असून ते रात्री 8 वाजून 25 मिनीटांनी संपणार आहे.

डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, चार तासांहून अधिक वेळ चालणार्‍या या खगोलीय घटनेदरम्यान पृथ्वीवरून चंद्र काहीशा अंधुक दिसणार
आहे आणि त्याच्या प्रकाशाची तिव्रता काही अंशी कमी होणार आहे. हे चंद्रग्रहण तेव्हा लागते, जेव्हा चंद्र हा पेनुम्ब्रा (ग्रहणावेळीचा पृथ्वीवरील छायेचा हलका भाग) वरून जात असतो. याप्रसंगी चंद्रावर पडणार्‍या सुर्यप्रकाशाची तिव्रता काही अंशी तुटलेली प्रतीत होते आणि ग्रहणावेळी ही सावली चंद्रावर पडलेली दिसते.

Leave a Comment