लेनोवोने सादर केले योगबुक अे १२


लेनोवोने त्यांच्या योगबुकचे नवे व्हर्जन ए १२ सादर केले असून हा कन्व्हर्टिबल टॅब्लेट लॅपटॉप आहे. पूर्ण दिवसभराच्या कामासाठी तो वापरता येतो व त्याला अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस दिली गेली आहे. अमेरिकेत ८ फेब्रुवारीपासून तो कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्याची किंमत २९९ डॉलर्स म्हणजे रूपयांत २००८९ अशी आहे. या महिनाअखेर तो जगातील अन्य देशातही उपलब्ध करून दिला जात आहे.

हे गॅजेट टॅब्लेट व लॅपटॉप अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. गनमेटल ग्रे व रेाझ गोल्ड कलर मध्ये तो उपलब्ध आहे. त्याला १२.२ इंची अँटी ग्लेअर डिस्प्ले, लॅपटॉप मोड व फ्लॅट मोड तसेच टँट मोडमध्ये वापरता येण्याची सुविधा दिली गेली आहे. फिजिकल बटणाऐवजी टच सेंसिटिव्ह सरफेसचा वापर यात केला गेला आहे. कीबोर्ड हॅलो असून त्यात प्रीलोडेड आर्टिफिशियल लर्निंग सॉफ्टवेअर आहे. त्याची टायपिंगला मदत होते. २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, मल्टीमिडीटा टास्किंग फिचर्स, डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्पिकर अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment