व्हेलेंटाईन डे ला शाओमीचा फोर एक्स लाँच


भारतीय बाजारात चांगलेच पाय रोवलेली चीनी स्मार्टफोन कंपनी त्यांचा नवा शाओमी फोर एक्स स्मार्टफोन १४ फेब्रुवारीला म्हणजे व्हेलेंटाईन डे रोजी चीनी बाजारात सादर करणार असून त्यानंतर तो भारतीय बाजारातही दाखल होणार आहे. कंपनीच्या विबो पेजवर त्या संदर्भातली माहिती दिली गेली आहे. हा फोन त्याच्या फोटोंसह लिस्ट केला गेला आहे.

या फोनला ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. २,३ व ४ जीबी रॅम व १६,३२ व ६४ जीबी इंटरनल मेमरी अशा व्हेरिएंटमध्ये तो उपलब्ध केला जात आहे. गोल्ड, सिल्व्हर व ग्रे रंगात हा फोन येईल. अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस असलेल्या या फोनला १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. व्हेलेंटाईन डे साठी त्याचे डिझाईन व अन्य अॅक्सेसरीज मध्ये थोडे बदल केले गेले आहेत. हा फोन साधारण १० हजार रूपयांतच ग्राहकांना मिळू शकणार आहे.

Leave a Comment