टेस्लाची इलेक्ट्रीक कार भारतात येणार


इलेक्ट्रीक कारबाबत जगाची नजर बदलण्यात यशस्वी ठरलेल्या टेस्ला मोटर्सचे संस्थापक एलन मस्क यांनी त्यांच्या इलेक्ट्रीक कार या उन्हाळी सीझनमध्ये भारतात लाँच केल्या जात असल्याची घोषणा केली आहे. वास्तविक गेल्या वर्षीच या कार भारतात लाँच केल्या जाणार होत्या, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता मात्र या कारसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा म्हणजे सुपरचार्जर स्टेशन्स येथे नसल्याने त्यांचे लॉचिंग लांबणीवर पडले होते. टेस्ला भारतात सुपरचार्जर स्टेशन नेटवर्क उभारणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

या कार्स महाग असल्या तरी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्याधुनिक आहेत. या कार्स भारतातील लग्झरी कार सेगमेंटशी थेट स्पर्धा करतील. विकसित देशांत इलेक्ट्रीक कार्सची ताकद दाखविल्यानंतर त्या आता भारतात येत आहेत. टेस्ला मॉडेल तीन ही कंपनीची सर्वाधिक परवडणारी कार असून तिची अमेरिकेतील किंमत २३ हजार डॉलर्स म्हणजे २३ लाख रूपये असली तरी भारतात ही कार ४० ते ५० लाख रूपयांत मिळेल असेही समजते.

भारतातील कार उत्पादकांनी इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये फार रस दाखविलेला नाही. महिंद्राने त्यांची रेवा लाँच केली होती मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

Leave a Comment