जटायू पार्क गिनीज रेकॉर्ड आणि पर्यटकांसाठी सज्ज


केरळातील चदयामलंगम येथे बनलेले जटायू नॅशनल पार्क एप्रिलमध्ये पर्यटकांसाठी खुले होत आहे. या वैशिष्टपूर्ण पार्कमध्ये उभारली गेलेली जटायूची भव्य प्रतिकृती गिनीज बुक रेकॉर्ड नोंदवेल असे सांगितले जात आहे. समुद्रसपाटीपासून ७५० फूट उंचीच्या पहाडावर उभारले गेलेले हे पार्क पर्यटक व साहसप्रेमींना नक्कीच आकर्षून घेईल असे सांगितले जात आहे.

या पार्कची कल्पना चित्रपट दिग्दर्शक राजीव आंचल यांना १२ वर्षांपूर्वीच सुचली त्यानंतर त्यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊन हे मानवनिर्मित नैसर्गिक पार्क उभारले आहे. त्याचा उद्देश निसर्ग रक्षण, पर्यावरण व पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे हा आहे. या पहाडावर उभारली गेलली जटायूची भव्य प्रतिमा त्याच जागी आहे जेथे रावणाने सीताहरण करत असताना प्रतिकार करणार्‍या जटायूचे पंख कापून त्याला जखमी केले होते. पर्यटक या प्रचंड मूर्तीच्या आत जाऊ शकणार आहेत. जटायूच्या डोक्यापर्यंत पोहोचणे व जटायूच्या डोळ्यातून आसपासचा परीसर न्याहाळण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या मूर्तीमध्ये एक थिएटरही आहे. तेथे रावण व जटायू यांचे युद्ध थ्री डी फिल्ममध्ये पाहता येणार आहे.

या पहाडावर हिरवळ उगवणे हे मोठे आव्हानाचे काम होते. पावसाचे पाणी साठवून ही हिरवळ केली गेली. पर्यटकांना केबल कारने पहाडावर नेले जाणार आहे. हे पार्क ६५ एकर परिसरात बनविले गेले आहे.

Leave a Comment