‘व्यापार थांबला तर महायुद्ध भडकेल!’


मेलबर्न: जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार थांबला तर महायुद्ध भडकू शकते, असा इशारा अलीबाबा या बलाढ्य चीनी कंपनीचे प्रमुख जॅक मा यांनी दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात अलीबाबा कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. त्यावेळी जॅक मा यांनी भाषण केले. तेव्हा ते म्हणाले, की जग सध्या व्यापारयुद्धात गुंतलेले आहे. आता व्यापार थांबवला तर युद्ध सुरू होईल. तसेच जागतिकीकरण म्हणजे केवळ आर्थिक उलाढाल आणि वस्तूंची अदलाबदल नाही, असेही ते म्हणाले. ‘रशिया टुडे’ या वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच प्रशांत महासागर व्यापार करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय चीनच्या दृष्टीने मोठी आपत्ती असल्याचे जॅक मा म्हणाले. गेल्याच महिन्यात जॅक मा यांनी ट्रम्प यांची भेट घेऊन अमेरिकेत १० लाख रोजगार निर्माण करण्याचा दावा केला होता.

Leave a Comment