बदामाचे फायदे


भारतामध्ये मधूमेहाचे प्रमाण इतके वाढत चालले आहे की भारताला जगाची मधुमेही राजधानी असे म्हटले जायला लागले आहे. मधुमेहामध्ये खाल्लेली साखर पचत नाही आणि ती उर्जेच्या स्वरूपात शरीराच्या विविध अवयवयांना प्राप्त होत नाही. परिणामी हृदरोगासारख्या रोगांना बळी पडावे लागते. यावर अनेक प्रकारे संशोधन झालेले आहे. मात्र सकाळी उठल्याबरोबर रात्रभर भिजवलेले आठ ते दहा बदाम खाणे हा हदय मजबूत करण्याचा सर्वाधिक प्रभावी इलाज असल्याचे दिसून आले आहे. बदामाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात कारण त्या प्रथिने, ई जीवनसत्त्व आणि मँगनीज मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हृदय आणि हाडे मजबूत होतात, कोलेस्टेरॉल कमी होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. रात्रभर भिजवलेले बदाम तर खावेच पण दोन जेवणाच्यामध्येही पाच-सहा बदाम खावेत. त्यामुळे कमी अन्नात पोट भरणे शक्य होते.

आपल्या वाडवडिलांनी बदामाचे उपयोग चांगलेच जाणले होते. टाईप टू डायबेटिसमुळे होणारा हृदरोग बदामामुळे आटोक्यात राहतो असे आता दिसून यायला लागले आहे. दिल्लीमध्ये २५ ते ७० वयोगटातील ५० प्रौढांच्या आरोग्याचे निरीक्षण केले गेले. हे सर्व लोक मधुमेही होते. त्यांना काही दिवस भिजवलेले बदाम खायला दिले. तेव्हा असे आढळले की मधुमेहातून हृदयरोग होण्याची प्रक्रिया त्यांच्या शरीरात मंदावलेली आहे. त्यांच्या कटी प्रदेशात साचलेली चरबी कमी झालेली आहे आणि हृदयविकारास कारणीभूत ठरणारे सगळे घटक त्यांच्या शरीरात कमी झालेले आहेत. डॉ. अनुप मिश्रा यांनी हे प्रयोग केले.

आता आपण मधुमेहींना एक औषध म्हणून बदाम दररोज खाण्याचा सल्ला देऊ शकतो एवढा आपला बदामा विषयीचा विश्‍वास वाढला आहे असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. अमेरिकेतील अलमोंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया या संस्थेने या संबंधात काही संशोधन केले आहे. त्यांनी ५० रुग्णांची त्यासाठी निवड केली. त्या सर्वांना रोज सकाळी मूठभर बदाम खाण्याचा सल्ला दिला. बदाम खायला सुरूवात करताच त्यातल्या बहुतेकांचे आहाराचे प्रमाण आपोआप घटले आणि घटलेल्या प्रमाणातील अन्नानेसुध्दा त्यांना एरवीच्या नेहमीच्या आहाराइतकीच ऊर्जा मिळायला लागली. ताकद वाढली पण अनावश्यक जाडी कमी झाली. त्यामुळे अलमोंड बोर्डालासुध्दा बदामामध्ये औषधी गुणधर्म असतात याची जाणीव झाली

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment