ग्रीन कार्ड संख्या निम्मी- ट्रंप देणार दणका


अमेरिकेत राहण्यासाठी दरवर्षी अन्य देशियांना देण्यात येणार्या ग्रीन कार्डची संख्या निम्म्यावर आणली जावी असा प्रस्ताव अमेरिकेच्या दोन सिनेटरनी सादर केला असून त्याला ट्रंप प्रशासनाचे समर्थन आहे असे समजते. रिपब्लीकन पक्षाचे सिनेटर टॉम कॉटन व डेमोक्रॅटिकचे सिनेटर डेव्हीड पर्डू यांनी मांडलेल्या या विधेयकामुळे अमेरिकेचे रहिवासी होऊ इच्छीणार्‍यांपुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

सिनेटमध्ये मांडण्यात आलेल्या या विधेयकानुसार रेझ अॅक्टनुसार दरवर्षी १० लाख जणांना ग्रीन कार्ड व कायदेशीर निवास परवाना दिले जातात. ती संख्या ५ लाखांवर आणली जावी असे सूचित करण्यात आले आहे. हे विधेयक संमत झाले तर लाखो भारतीय अमेरिकन लोकांवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यातही ज्यांना ग्रीन कार्डची प्रतीक्षा आहे त्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. सध्याच हे कार्ड मिळविण्यासाठी १० ते १२ वर्षे वाट पहावी लागते आहे.

Leave a Comment