शैक्षणिक क्षेत्रात परतल्याचा आनंद-रघुराम राजन


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गर्व्हनरपदाचा कार्यकाल पुरा करून शिकागोत आपल्या मूळ शैक्षणिक क्षेत्रात परतल्यानंतर रघुराम राजन यांनी शिकागोत परतून चांगले वाटत असल्याचे पहिल्याच मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले शिकागोतील लेकशोर ड्राईव्ह वरच्या बाईक लेनमधून बाईक चालविण्याचा आनंद कांही वेगळाच आहे व हा आनंद मला दीर्घकाळ उपभोगता यावा अशी इच्छा आहे.

रिझर्व्ह बँकेची राजन यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती. तेव्हाच राजन यांनी त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक क्षेत्रात परतायला आवडेल असे सांगितले होते. शिकागोच्या बूथ स्कूल ऑफ बिझिनेस मध्ये ते प्रोफेसर आहेत. राजन म्हणाले गेली २५ वर्षे हेच माझे घर आहे. शिकागो हे महान शहर आहे माझे सर्व सहकारीही चांगले आहेत. या शहरात बाईक चालविणे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचे ठरले होते तो आनंद पुन्हा उपभोगता येतोय. वैश्विक अर्थसंकटामुळे पुढील ३० वर्षे संशोधनासाठी विषय मिळाले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment