उबेर आणतेय हवाई टॅक्सी


वाहतूक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवू शकेल अशा हवाई टॅक्सीसाठी गुगल व एअरबस सारख्या कंपन्या प्रयत्नशील असतानाच अॅप आधारित टॅक्सी सेवा देणार्‍या उबेरने यासाठी त्याची वाटचाल जोरदार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नासामधील इंजिनिअर मार्क मोर याने २०१० साली उडणार्‍या कार व शहरी वाहतूकीत त्यांचे महत्त्व या संदर्भात एक पेपर प्रसिद्ध केला होता. हा मार्क उबेरमध्ये संचालक मंडळात सामील झाला आहे.

उबेरने कंपनीच्या ऑन डिमांड एअरबॉर्न ड्राईव्ह प्रोजेक्ट उबेर एलिव्हेट मध्ये मार्कला इंजिनिअरींग संचालक मंडळात घेतले आहे. उबेर निवासी क्षेत्रातच वर्टिपोर्टस बनविण्याच्या तयारीत आहे. या हवाई टॅक्सी व्हर्टीकल टेकऑफ व लँडींग करतील व ५० ते १०० मैल परिसरात सेवा देतील. एअरबसने त्याच्या फ्लाईंग टॅक्सी राईड टेस्ट २०१७ मध्येच घेण्याची योजना जाहीर केली आहे. उबेरच्या हवाई टॅक्सी कधी वापरात येणार याबाबत मात्र कंपनीने खुलासा केलेला नाही.

Leave a Comment