जपानी संशोधकांनी अशी एक सिस्टीम तयार केली आहे जी फाईव्ह जी मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत १० पट अधिक वेगाने डेटा ट्रान्समिट करू शकते. या सिस्टीममुळे केवळ डाऊनलोड स्पीडच वाढतो असे नाही तर इनफ्लाईट नेटवर्क कनेक्टिव्हीटी स्पीडही वाढू शकणार आहे. जपानच्या हिरोशिमा विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी टेराहर्टज ट्रान्समिटर बनविल्याची माहिती दिली आहे.
फाईव्ह जीपेक्षा दसपट वेगवान ट्रान्समिटर तयार
हा ट्रान्समिटर सिंगल चॅनलवर ३०० गीगाहर्टज बँडचा वापर करून १ सेकंदात १०० गीगाबाईट वेगाने डिजिटल डेटा ट्रान्स्फर करतो. टेराहर्टज हा नवा बँड आहे व भविष्यात अल्ट्रा हाय स्पीड वायरलेस कम्युनिकेशन मध्ये त्याचा वापर करता येणार आहे. आयसी आधारित ट्रान्समिटरमधून १०० गीगाबाईट प्रति सेकंद वेगाने डेटा एक्स्चेंज करता येत असल्याची ही पहिलीच वेळ आहे.